सातारा, दि. 18 : गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत गोशाळांमधील देशी गाईंच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रति पशु रु. ५०/- अनुदान योजना" राबवण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. पात्र गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थांनी ऑनलाईन अर्ज 31 डिसेंबर पर्यंत करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी केले आहे. जिल्ह्यातील गोसंगोपनाचा किमान ३ वर्ष अनुभव असलेल्या, गोशाळेत किमान ५० गोवंश व संस्थेतील ईअर टॅगिंग (भारत पशुधन प्रणालीवर) असलेले तसेच गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थांमधील देशी गाई अनुदानास पात्र आहेत.
महाराष्ट्र गोसेवा आयोग कार्यालयाकडे सादर केलेला थेट प्रस्ताव तसेच ई-मेल किंवा तत्समद्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. सदर योजनेचा उद्देश व स्वरूप, अनुदान पात्रतेच्या अटी व शर्ती, योजनेची अंमलबजावणी, तसेच योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे इत्यादी बाबतची सविस्तर माहिती www.mahagosevaayog.org व https://schemes.