फलटण तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस राजेंगटाने विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. तालुकातील सर्वात मोठ्या व प्रतिष्ठेच्या विडणी चे सरपंच पद मात्र भाजपा पुरस्कृत विडणी विकास आघाडीने पटकावत राजे गटाला विचार करण्यास भाग पाडले आहे.
फलटण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुक मतदान पुर्व चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असुन उर्वरीत २० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले आज झा लेल्या मतमोजणीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने २० ग्रामपंचायतींवर आपल्या विजयाची मोहर उमटवुन वर्चस्व सिद्ध केले आहे तर भाजप ने दोन ठिकाणी विजय मिळविला तर सुरवडी आणि गिरवीचे होमपिच अनुक्रमे . प्रल्हादराव साळुंखे- पाटील व सहयाद्री कदम यांनी राखले बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादी कॉग्रेसचा वरचष्मा असल्याचे निवडणुकीनंतरचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे
विडणी ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे सरपंचपदाचे उमेदवार सागर अभंग निवडुन आल्याने गेल्या अनेक वर्षाच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक सत्तेला भाजपने सुरूंग लावला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ . बाळासाहेब शेंडे यांचे स्थानिक नेतृत्वाखाली गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली १७पैकी १३ सदस्य राष्ट्रवादी व४ सदस्य व सरपंच असे भाजपाचे बळ या ग्रामपंचायतीत बघायला मिळणार आहे.
नवखा उमेदवार सरपंच झाल्यामुळे भाजपने या ग्रामपंचायतीमध्ये जोरात मुसंडी मारल्याचे दिसते
सुरवडी ग्रामपंचायतीची सत्ता गेली २५-३० वर्ष प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होती यावेळीही त्यांनी पुन्हा या ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याने विजयाची परंपरा कायम राखली आहे पाटील यांच्या सुनबाई सौ . शरयु जितेंद्र साळुंखे पाटील यांनी सरपंचपदावर बाजी मारली आहे
निवडणु प्रचार दरम्यान प्रल्हाद साळुंखे पाटील यांनी केलेली भिष्म प्रतिज्ञा अखेर या विजयांने सत्यात उतरविली या ग्रामपंचायतीमध्ये गेली अनेक वर्ष फिरकु दिले नसल्याचे पाटील यांनी पुन्हा एखदा सिद्ध केल्याने आगामी राजकारणातील आपले राजकीय वजन विरोधकांना विचार करायला लावणारे ठरले आहे
गिरवी ग्रामपंचायतीवर सहयाद्री चिमणराव कदम गटाने विजय मिळवुन आपले आपले राजकीय होम पिच भक्कम केल्याचे स्पष्ट झाले आहे गिरवीच्या राजकारणातील कदम गट गेली काही वर्ष मागे असल्याचे चित्र होते मात्र या विजयामुळे पुन्हा एखदा सह्याद्री भैय्याकदम गटाला राजकीय उर्जितावस्था येणार असल्याचे या निवडणुक निकालाने अधोरेखीत केले आहे
दुधेबावी ग्रामपंचायतीवर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या सुविध पत्नी सौ . भावना सोनवल कर या सध्या जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या असुन त्या या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदासाठी उभ्या होत्या मात्र त्या या निवडणकीत विजयी झाल्या असल्या तरी त्यांना या निवडणुकीत झगडावे लागल्याचे त्यांना पडलेल्या मतांवरून स्पष्ट झाले आहे
पिंपरद ग्रामपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादीने विजय खेचुन आणला आहे.
फलटण तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुक निकालाने मतदारांचा कौल राष्ट्रवादीकडे कायम असल्याचे अधोरेखीत केले आहे त्यामुळे 20 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने विजयाची पताका फडकविली आहे भाजपने दोन ठिकाणी तर पाटील कदम गटाने प्रत्येकी एक ग्रामपंचायत ताब्यात ठेवली आहे
गांव निहाय विजयी सरपंच नावे
वडले- संतोष दिनकर लाळगे, राष्ट्रवादी
विडणी = सागर अभंग ,भाजपा
दुधेबावी -सौ . भावना माणिकराव सोनवलकर , राष्ट्रवादी
गिरवी _ धनश्री कदम, सह्याद्री कदम गट
आदकी बु . =गणपतराव धुमाळ, राष्ट्रवादी
आदर्की खुर्द _ निलम निंबाळकर ,राष्ट्रवादी
सालपे- दादासो कोळपे, राष्ट्रवादी
पाडेगांव -राहुल कोकरे, राष्ट्रवादी
मठाचीवाडी -जयश्री भोसले, राष्ट्रवादी
बरड - प्रकाश लगुंटे, राष्ट्रवादी
सुरवडी - सौ.शरयु साळुंखे - पाटील, प्रल्हाद साळुंखे -पाटील गट
च०हाणवाडी - चंद्रभागा गोरे ,राष्ट्रवादी
कुसूर - ज्योती नरूटे,राष्ट्रवादी
सोमंथळी _ किरण सोडमिसे.राष्ट्रवादी
पिंपरद- सौ स्वाती भगत. राष्ट्रवादी
चौधरवाडी -तुकाराम कोकाटे. राष्ट्रवादी
वाठार निंबाळकर _ सुवर्णा नाळे. राष्ट्रवादी
ताथवडा -दशरथ शिंदे. राष्ट्रवादी
कुरवली खुर्द -राहुल तोडकर. राष्ट्रवादी
तरडफ=रंजना गोडसे, राष्ट्रवादी
बिनविरोध चार ग्रामपंचायत सरपंच
वेळोशी मानेवाडी झडक बाईची वाडी मिरेवाडी ( कुसूर )