राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर इयता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण विधार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील लुंबिनी बहुद्देशीय सामाजिक संस्था, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळ यांच्यावतीने मंगळवार पेठेतील १० वी, १२ वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन येथे आयोजित करण्यात आला होता.
सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत वॉरंट ऑफीसर जे.एस. काकडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. प्रा. प्रभाकर पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर इयता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण विधार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान अथर्व अनंत काकडे (१२वी ८५%) व संयुक्ता महावीर अहिवळे (१०वी ९०%) या दोघांना “नालंदा सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
यानंतर डॉ. प्रा. प्रभाकर पवार, सागर डांगे, प्रा. रमेश आढाव, जे.एस. काकडे, दत्ता अहिवळे यांनी उपस्थित विधार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन लुंबिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कुणाल काकडे, अभिलाष काकडे, सुशांत काकडे, सुरज काकडे, स्वप्नील काकडे, आदित्य काकडे, डॉ. निलेश गायकवाड, अजय जगताप आदींनी केले होते.
कार्यक्रमास फलटण नगरपालिकेचे नगरसेवक सचिन अहिवळे, सुधिर अहिवळे, सौ.सुपर्णा सनी अहिवळे, अक्षय अहिवळे, राजाभाऊ काकडे, मधुकर काकडे, विकास काकडे (सर ) ओंकार गायकवाड यांच्यासह विद्यार्थी, पालक, नागरिक उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत सुशांत काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. वैशाली कांबळे मॅडम यांनी मानले.
सुमारे ९० यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त येथील १० वी, १२ वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ लुम्बिनी सामाजिक संस्थेने आयोजित केला होता. यावेळी सुमारे ९० यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला