फलटण : फलटण येथील मलटण गणेशोत्सव मंडळ मलटण, फलटण तालुका वारकरी मंडळ फलटण तसेच महिला भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक अथर्वशीर्ष पठण सोहळा शेकडो महिलांच्या उपस्थितीत पार पडला. मलटण गणेशोत्सव मंडळाची सामूहिक अथर्वशीर्ष पठणाची ही परंपरा यावर्षीही कायम राहिली यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव व माजी नगरसेविका सौ. विजयाताई जाधव यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले यावेळी उपस्थित महिलांमधून आकरा महिलांना मानाची पैठणी देण्यात आली.
सकाळी आठ वाजता सुरू झालेले सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने संपूर्ण बाणगंगा नदी परिसर भक्तिमय झाला होता. फलटण मधील विविध भागातील तसेच काही ग्रामीण भागातून सुद्धा महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. आलेल्या सर्व महिलांना दूध वाटप करण्यात आले. यावेळीं फलटण तालुका वारकरी मंडळाचे अध्यक्ष हभप. केशवराव जाधव महाराज, माजी नगरसेवक बाळासाहेब कुंभार, राजाभाऊ नागटिळे, प्रा रविंद्र कोकरे, माजी नगरसेविका मीना नेवसे, नितीन जगताप, मयूर जाधव इत्यादी उपस्थित होते.