फलटण प्रतिनिधी - क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या १९८ व्या जयंती निमित्त फलटण येथील क्रांतिभूमी महात्मा फुले स्मारक येथे जयंती निमित्त विविध सामाजिक व राजकीय लोकांनी तसेच फुले प्रेमींनी अभिवादन केले यामध्ये विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर , फलटण- कोरेगाव चे आमदार सचिन पाटील, माजी आमदार दिपकराव चव्हाण, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर , फलटणचे तहसीलदार डॉ अभिजित जाधव, फलटण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा , निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे , भाजपा चे जेष्ठ नेते समशेरसिंह ना निंबाळकर , युवराज अनिकेतराजे ना निंबाळकर ,युवा नेते अमरसिंह ना निंबाळकर , श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ बाळासाहेब शेंडे , मिलिंद नेवसे, विवेक शिंदे, शंकर आप्पा माडकर यांनी अभिवादन केले.
फलटण येथे नव्याने सुशोभित केलेल्या महात्मा जोतिबा फुले यांचे स्मारक फलटण नगरपरिषदेच्या स्वाधीन करत क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती उत्सव समितीने एक नवा आदर्श घालून दिला आहे. शासनाचा कोणताही निधी न घेता लोकवर्गणीतून व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने हे स्मारक पूर्ण झाले आहे. फलटण येथे या स्मारकाचे हस्तांतरण जयंती उत्सव समितीकडून फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांचेकडे करण्यात आले.
महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी फलटण मधील विविध सामाजिक संघटना व फुले प्रेमींनी गर्दी केली होती सकाळी पाच वाजता तालुक्यातून १०० सायकल स्वार सहभागी होत फलटण ते तरडगाव अशी समता सायकल रॅली काढण्यात आली. ठीक ठिकाणी या रॅलीचे स्वागत फुले प्रेमींनी केले. या रॅलीत तरुण तसेच जेष्ठ नागरिकांनी ही भाग घेतला होता. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक शैक्षणिक विचारमंच चौधरवाडी यांनी ही रॅली आयोजित केली होती. या मध्ये तुकाराम कोकाटे ,राधेश्याम खंडेलवाल , चंद्रकांत मिसाळ यांनी सहभाग घेतला
सकाळी दहा वाजता फलटण शहरातून महिला व तरुणींनी भव्य बाईक रॅली काढली होती या मध्ये हजारो महिला व तरुण सहभागी झाले होते शहरातील मुख्य मार्गावरून ही रॅली महात्मा फुले स्मारक येथे विसर्जित झाली.
पुतळ्याच्या संरक्षक भिंतीवर फुले विचार ...
महात्मा फुले यांचे विचार त्यांच्या साहित्यातून दिसतात त्यांचे अखंड काव्यातून अनेक प्रबोधनकारी विचार त्यांनी मांडले फलटण येथील महात्मा फुले स्मारकाच्या संरक्षक भिंतीवर हे विचार कोरल्याने एक आदर्श निर्माण झाला असून सर्व फलटणकर नागरिकांनी स्मारक पाहण्यासाठी विशेष गर्दी केली होती.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक व शैक्षणिक विचारमंच , मराठा क्रांती मोर्चा फलटण , मुधोजी हायस्कूल शिक्षक वृंद , आयडियल इंटरनॅशनल स्कूल फलटण , फलटण तालुका वकील संघ मराठी पत्रकार परिषद फलटण , सृजन फाऊंडेशन , महात्मा फुले विचार अभियान ,महाराष्ट्र , फलटण शहर मुस्लिम बांधव आदींनी महात्मा फुले यांना अभिवादन केले.