फलटण दि. 10 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने पंचशील रिक्षा स्टॉप, बारामती चौक फलटण यांच्या वतीने अन्नदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती चौक, फलटण येथे दि. १४ एप्रिल रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे, ईच्छुकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदात्यास प्रोत्साहनपर आकर्षण भेटवस्तू दिली जाणार आहे.
पंचशील रिक्षा स्टॉप येथील सर्व रिक्षाचालक व मालक वर्षभर आपल्या कमाईतून काही हिस्सा बाजूला ठेवत अन्नदान करत असतात हे त्यांचे 10 वे वर्ष आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.