फलटण : फलटण नगरपरिषद व फलटण सायकल असोसिएशन यांचे संयुक्त पुढाकाराने दि.०२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांचे जयंतीनिमित्त व केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणा-या स्वच्छता ही सेवा-२०२४ (थीम-: स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता) चे औचित्य साधून नागरिकांमध्ये स्वच्छता विषयक जागरूकता, पर्यावरणपूरक संसाधनाच्या वापराबाबतची कटिबद्धता व सुदृढ आरोग्यविषयक संदेश प्रचार करिण्याकरिता "सायकल रॅली (Cyclothon) चे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निखील मोरे, प्रशासक तथा मुख्याधिकारी फलटण नगर परिषद यांनी केले आहे.
रॅलीची वेळ सकाळी ०७.१५ वाजताअसून रॅलीच्या सुरुवातीचे ठिकाण महात्मा गांधी चौक पुतळा परिसरातून होणार आहे. रॅलीच्या समाप्तीचे ठिकाण फलटण नगरपरिषद जुनी इमारत प्रांगण असणार आहे.
रॅलीच्या प्रस्तावित मार्ग पुढील प्रमाणे
महात्मा गांधी चौक (पुतळा परिसर) महात्मा फुले चौक-श्रीमंत मालोजीराजे पुतळा-गिरवी नाका-लाकडी चौक-डी.एड.चिक- पृथ्वी चौक नाना पाटील चौक-पुणे रोड पालखी रोड-उम्ब्रेश्वर चौक-हरीबुवा मंदिर-सिमेंट रोड-छत्रपती शिवाजी महाराज चौक-भारतरत्न डॉ. आंबेडकर चौक नगरपरिषद जुनी इमारत प्रांगण तरी, सर्व स्थानिक मा. पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.