फलटण प्रतिनिधी:- विवाहित महिलेस लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी फलटण येथील एका तरुणाच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर संशयित आरोपी तरुणास अटक करण्यात आले आहे.
पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहित महिलेला एक मुलगी आहे फिर्यादी व मुलगी ह्या माहेरी राहत आहेत. डिसेंबर २०२२ पासून ते दिनांक १८ में २०२४ दरम्यान वेळोवेळी दत्तनगर फलटण ता. फलटण जि. सातारा येथे हैदर शब्बीर मेटकरी (रा. मेटकरी गल्ली फलटण ता. फलटण जि. सातारा) याने विवाहित महिलेस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. विवाहित महिलेने हैदर यास तु माझेशी लग्न कधी करणार आहे, असे विचारलेवर त्याने तुझी कोर्टातील केस संपल्यावर आपण लग्न करू असे म्हणत होता. त्यानंतर १२ फेब्रुवारी २०२३ रोजी हैदर हा फिर्यादी महिलेच्या रूमवर आला त्यावेळी महिलेस त्याच्या मोबाईलमध्ये त्याची पत्नी व तीन मुलींचे फोटो दिसले तेव्हा महिलेने त्यास या मुली कोणाच्या आहेत असे विचारले असता त्यावेळी त्याने महिलेस सांगितले की, मला तीन मुली आहेत व माझी पत्नी आणि तीन मुली या माझ्या जवळच मेटकरी गल्ली फलटण येथे राहत आहेत तसेच मी म्हणेन तसेच तु वागायचे, बुरखा घालायचा, टिकली लावायची नाही, नमाज पाडायचे हे सर्व तुला करावे लागेल तरच मी तुझ्याशी लग्न करीन असे सांगीतले. त्यानंतर महिलेने त्याचे नाही ऐकले तर तो फिर्यादी महिलेस मारहाण करीत होता. दिनांक १५ मार्च २०२४ रोजी हैदर याने त्याचे मोबाईलमध्ये महिलेस दोघांचा व्हिडिओ बनवून त्यामध्ये त्याने मी हिचा दोन वर्षापासुन सांभाळ करतोय, ही माझी बायको आहे, असे म्हणून गालावर किस केलेला व्हिडीओ बनवला. त्यानंतर तु जर माझी पोलिसांकडे तक्रार केलीस किंवा मला सोडून गेलीस तर मी तुझे फोटो व व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी दिली. त्यानंतर दिनांक १८ मे २०२४ रोजी रात्री हैदर हा दत्तनगर येथील महिलेच्या रूमवर आला व म्हणाला की, तु माझ्या घरच्यांना भेटली आहेस, मी आता तुझ्याशी लग्न करणार नाही, तु इथून निघून जा, असे म्हणून महिलेस शिवीगाळ करून तो तेथून निघून गेला. सदर प्रकरणी महिलेने हैदर शब्बीर मेटकरी विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी हैदर शब्बीर मेटकरी यास अटक करण्यात आली असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.