फलटण प्रतिनिधी:- ऐन दिवाळी सणा दिवशी फलटण पंढरपूर रस्त्यावर बरड गावाच्या हद्दीत चार चाकी व ट्रकच्या भीषण अपघात होऊन तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, विजापूर (कर्नाटक) हुन पाडेगाव येथील भैरवनाथ ट्रक गॅरेजचे मालक सागर रामचंद्र चौरे (वय ३४, रा पाडेगाव ता खंडाळा) चालक निलेश चंद्रकांत शिर्के (वय ४०, रा खटाव) व भाऊसो आप्पा जमदाडे (वय ४५, रा खेड बु. ता खंडाळा) हे तिघेजण चाकी क्रमांक एम.एच. ५३.ए.०५१४ मधून विजापूरहून फलटण कडे येत होते पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास बरडहून अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर एम.एच.४६.सी.एल.९६५१ या ट्रक चकाने ट्रक वेगाने चालवून दिलेल्या धडकेत चार चाकी गाडीचा अपघात झाला या अपघातामध्ये गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रथमतः ट्रक चालक घटना स्थळावरुन पळून गेला असल्याने कोणत्या ट्रकने अपघात केला याची माहिती मिळत नव्हती परंतु अपघातात घटनास्थळी ट्रक नंबर प्लेट आढळून आली पण ट्रक घटनास्थळी कडून आला नाही. अपघातानंतर रेडियेटर फुटलेने ट्रक राजुरी जवळ बंद पडला व चालक अंधारात पळून गेला असल्याने सकाळी पोलिसांनी रोडला गाडीचा शोध घेत असता ट्रक आढळून आला. चार चाकी मधून पोलिसांनी स्थानिक लोक मदतीने जखमीना बाहेर काढून दवाखान्यात उपचाराकरता पाठवले पण तिघांना डॉक्टरांनी दवाखान्यात मयत घोषित केले.पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, पोलिस उप निरीक्षक पाटील, एपीआय जयपत्रे, ए.एस.आय मठपती, हवालदार यादव, अभंग, अडसूळ, शिंदे यांनी तात्काळ घटनास्ताळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.ऐन दिवाळीच्या दिवशी तिघांच्याही मृत्यूमुळे पाडेगाव खटाव व खेड या गावावर शोककळा पसरली आहे हा अपघात नेमका कसा झाला याबाबतचा तपास फलटण ग्रामीणचे पोलिस करीत असून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.