फलटण प्रतिनिधि -
खराडेवाडी (साखरवाडी ) ता. फलटण या परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले पोलिस प्रशासनाकडून या चोरांवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. लोणंद ( ता. खंडाळा ) या पोलिस स्टेशन अंतर्गत खराडेवाडी हे गाव असून पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त घालावी अशी मागणी होऊ लागली आहे.
सोमवारी दि. २८ च्या मध्यरात्री २ च्या सुमारास मोहितेवस्ती या ठिकाणी चोरट्यानी एक घर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र जागरूक नागरिकांनी ताबडतोब फोन वरून एकमेकांना संपर्क साधल्याने गोंधळ लक्षात येताच अंधाराचा फायदा घेत चोरटे दुचाकीवरून पसारा झाले. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या पूर्वीही या भागात कृषिपंप व केबल चोरी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक शेतक-यांच्या कृषिपंपांची केबल चोरीच्या घटना घडल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांच्या कृषीपंप खरेदीच्या पावती गहाळ झाल्याने चोरीची तक्रारीही पोलिसांनी घेतल्या नाहीत. त्यामुळे या कृषीपंप चोरीचा तपास लागला नाही. पुन्हा एखादा खराडेवाडी परिसरात चोर सक्रिय झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हे प्रकार थांबण्याकरीता पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व गुन्हेगारीला आळा घालावा अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.