वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाने कडक निर्बंध घातले आहे. या निर्बंधांच्या अंमलबजावणीची पाहणी आज पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केली.
सातारा : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाने कडक निर्बंध घातले आहे. या निर्बंधांच्या अंमलबजावणीची पाहणी आज पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केली.
पालकमंत्री ना. पाटील यांनी सातारा शहरातील पोवई नाका, मोती चौक, एसटी स्टॅण्ड परिसराची पाहणी केली.
यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अमंलबजावणी करा, अशा सूचना पोलीस विभागाला पालकमंत्री पाटील यांनी पाहणी दरम्यान केल्या.
यानंतर पालकमंत्री पाटील यांनी नगरपरिषदेच्या पुज्य कस्तुरबा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथे सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची माहिती घेऊन लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.