फलटण : प्रतिनिधी
ज्ञानोबा माऊली तुकाराम हा वारकरी गजर ऐकला की आपणही विठ्ठलमय होऊन जातो मग आपल्या तोंडूनही तीच विठ्ठलमय आरोळी उमटते आणि आसमंतात असंख्य विठ्ठल अवतरतात आणि अवघा आसमंत भक्तिमय होऊन जातो. यंदाही तोच अनुभव सुवर्णस्पर्श फाऊंडेशन फलटण यांच्या कार्यामुळे असंख्य माऊलींनी घेतला. सुवर्णस्पर्श फाऊंडेशन फलटणच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती शबाना पठाण या फलटण येथे संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात वारीला येणाऱ्या असंख्य भक्तांना अन्नदान करत असतात. याही वर्षी असंख्य वारकर्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.त्याचबरोबर कराड येथील कादम्बिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. संध्या पाटील यांनीही मोलाची मदत केली. तसेच जादूगार व कवयत्री सौ. सायली देशपांडे, सचिन काटकर, विद्यार्थी आणि फाऊंडेशन वर प्रेम करणारे असंख्य नागरिक यांनीही मदतीचा हात देत अन्नदाना कार्यक्रम यशस्वी झाला. यावेळी संस्थेच्या पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.