फलटण प्रतिनिधी-
निरगुडी. येथील होलार समाज बांधवांना वस्तीत जाणेसाठी हक्काचा बारा फुटी गाडीरस्ता मिळावा यासाठी आणि होलार समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निरगुडी येथे होलार समाजाची 200 ते 250 लोकसंख्या आहे. परंतु दुर्दैवाने आजही हक्काचा गाडी रस्ता नसल्याने वस्तीतील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गाडीरस्त्याचा प्रश्न प्रशासनाने तात्काळ मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीही होलार समाजाच्या वतीने रस्ता मिळण्यासाठी अनेकदा निवेदने दिली आहेत परंतु त्याबाबत शासनाकडून कोणत्याही स्वरूपाची ठोस पावली उचलली गेली नाहीत.निरगुडी गावातील होलार समाज बांधवांना न्याय मिळेल अशी आशा समाज बांधव व्यक्त करीत आहेत.
यावेळी ॲड. रामचंद्र घोरपडे महेंद्र गोरे, निलकुमार गोरे, राहुल करे, होलार समाजाचे फलटण तालुका उपाध्यक्ष ओमकार अहिवळे, प्रशांत सोनवणे,अजित गोरे, आदेश गोरे, योगेश गोरे, अमित आवटे, प्रविण गोरे, विघ्नेश गोरे, आदित्य गोरे, जयकुमार गोरे ,सुर्यभान सोनवणे आदी समाज बांधव उपस्थित होते.