फलटण : प्रतिनिधी
नाईकबोमवाडी ता.फलटण येथील धीरज श्यामराव चव्हाण यांची राष्ट्रीय सामाजिक, न्याय व मानवाधिकार आयोगाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. राष्ट्रीय सामाजिक, न्याय व मानवाधिकार आयोगाचे राज्यअध्यक्ष जितेंद्र काटकर व सचिव सुखदेव सस्ते यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.
बांधकाम व्यावसायिक धीरज चव्हाण गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय, बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. श्रीमंत निर्मलादेवी मुद्रण संस्था फलटण येथील व्यवस्थापक श्यामराव चव्हाण यांचे ते सुपुत्र आहेत.
धीरज चव्हाण यांच्या निवडीबद्दल त्यांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण,महाराष्ट्र खो -खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन होत आहे.