फलटण | धैर्य टाईम्स |
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. त्यांचा ७६ वा वाढदिवसानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण येथे दिनांक ३० मार्च गुढीपाडवा या दिवशी सायंकाळी ६ वाजता भीम फेस्टिवल २०२५ अंतर्गत जल्लोष भीम गीतांचा या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे माहिती कार्यक्रमाचे आयोजक सोनू संग्राम अहिवळे व संग्राम अहिवळे, युवा उद्योजक यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण असणार आहेत. तर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन, मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर युवराज फलटण संस्थान, सुनिल आनंदराव जाधव साहेब सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सातारा, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर मा. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर चेअरमन गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस् फलटण, दत्ता म्हस्के समाज कल्याण निरीक्षक, सातारा यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
यावेळी श्री गणेश दुबळे दिग्दर्शित 'चवदार तळाचा सत्याग्रह' नाटिकेचा प्रयोग, उच्चशिक्षित व गुणवंत विद्यार्थ्यांचा 'गुणगौरव' व 'दर्पण पुरस्कार प्राप्त' पत्रकारांचा सन्मान तसेच सामाजिक चळवळीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीम गीतांच्या गायिका, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांचे सही आहे रे फेम कडुबाई खरात यांचा "जल्लोष भीम गीतांचा" हा विशेष कार्यक्रम होणार आहे. यावेळी तृप्ती बोरकर, आंबेडकरी इन्फलून्सर रील स्ट्रार, ऋतिक गंगावणे फॅन झालो ग स्वाभिमानाने जय भीम फेम, प्रज्ञा कांबळे भीम गायिका यांची उपस्थिती असणार आहे.
सनी अहिवळे माजी नगरसेवक,हरीश काकडे (आप्पा) सामाजिक कार्यकर्ते, यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रोहित माने, गणेश बिराडे, सिद्धार्थ अहिवळे, विकी काकडे, आदित्य साबळे, विशाल गुंजाळ, मुकुल अहिवळे, रवी मोरे, तेजस भोसले हे कार्यकम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.