फलटण प्रतिनिधी :
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फलटण येथील उमाजी नाईक चौक येथे उमाजी नाईक तालीम मंडळ व फलटण केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले.
यावेळी लक्ष्मण जाधव, सावजी मदने, डॉ. सुभाष गुळवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी फलटण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संग्रामसिंह धुमाळ,उपाध्यक्ष रणजित कदम, सचिव संजय शहा, सहसचिव प्रणव मंत्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळीसर्दी,खोकला, ताप, गुडघेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी डोकेदुखी, एलर्जी या आजाराचे 1200 पुरुष व महिला, यांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
वारकऱ्यांची तपासणी डॉ.सुभाष गुळवे, अध्यक्ष फलटण तालुका भारतीय जनता पार्टी, वैद्यकीय आघाडी सेल यांनी केली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची 2011 सालापासून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार केले जातात.