फलटण प्रतिनिधी :
अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांच्या कुटुंबाचे पुनर्वसन आर. के सी.कंपनी ने करावे. फलटणच्या लोकप्रतिनिधिंनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आर्थिक मदतीची तरतूद करावी : मा. नगरसेवक सनी अहिवळे
अपघातात मृत झालेल्या गणेश लोंढे व अमीर शेख कुटुंबियांना प्रत्येकी ५०-५० लाख आर्थिक मदत मिळणेबाबत तसेच आर. के. सी.इन्फ्रा स्ट्रक्चर कारवाई करणेबाबत फलटण तालुक्याील तरुण वर्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
आळंदी - पंढरपूर पालखी महामार्गाचे काम करणाऱ्या आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी च्या नियमबाह्य व धोकेदायक कामामुळे अमीर शेख व गणेश लोंढे तरुणांना जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी आर.के.सी कंपनी यांच्या विरोधात गुरुवारी सकाळी 10 वाजता फलटणकरांनी मोर्चा चे आयोजन केले होते.
दिनांक १५ रोजी रात्री तांबमळा येथील गुरू हॉटेलचे पुढे आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी च्या सूर्यस्ता नंतरही मुरूम वाहतूक करणाऱ्या दहा चाकी टिपर ने फलटण येथील दुचाकीवरून निघालेल्या दोन तरुणांना दिलेल्या धडक देत फरपटत नेहत अपघात केला यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. फलटण येथील दोन तरुणाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी जबाबदार असणाऱ्या आर.के.सी इन्फ्रा स्ट्रक्चर प्रा ली कंपनी यांच्या विरोधात मृत कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी फलटणकरांनी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी १० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन मंगळवार पेठ फलटण येथून, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालय (प्रांत कार्यालय) पर्यंत सदरचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठया प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, आर. के.सी इन्फ्रास्टक्चर प्रा. लि कंपनीच्या मनमानी व बेकायदेशीर कामामुळे होतकरु निष्पाप तरुणांचा बळी घेतला आहे. ठेकेदाराने आपण या बळील कारणीभूतच नाही असे भासवण्यासाठी घटनेच्या त्याच रात्री पहाटे ३ वाजता दुहेरी वाहतुक सुरळीत करण्यात आली अपघातास कारणीभूत अधिका-यावर तसेच कंपनीच्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. गेल्या १५ दिवसात अनेक अपघात याच रोडवर झालेले आहेत आणि लोक जिवानीशी गेले आहेत काहींना आयुष्यभरासाठी अपंगत्व आलेले आहे. परंतु लोकांच्या सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना प्रशासनाकडुन घेतली गेलेली नाही प्रांत अधिकारी व तहसिलदार अधिकारी यांनी जर ठेकेदारावर अंकुश ठेवला असता तर आज अमिर शेख व गणेश लोंढे यांचे प्राण वाचले असते. अमिर शेख व गणेश लोंढे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५०-५० लाखाचा निधी देण्यात यावा तसेच या दोघांचा बळी घेणा-या कंपनीवर गुन्हा दाखल करावा व काळया यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे. जोपर्यंत आर. के. सी. कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही तसेच त्यांच्या वारसांना निधी मिळत नाही, तोपर्यंत आर. के. सी. कंपनीचे काम बंद पाडण्यात येईल व पुढे काम चालु दिले जाणार नाही असे निवदेणात म्हंटले आहे.
उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांना निवेदन देताना फलटणमधील तरुण