शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीतील मंगळवारपेठ बोगदा येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विजय ऊर्फ पिल्या राजू नलवडे वय 30 वर्ष रा. मंगळवार पेठ सातारा वारंवार गुन्हे करण्यात सरसावलेला असल्याने त्यास सातारा जिल्हयातून तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव शाहुपुरी पोलीस ठाणेकडून पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्फत उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) सातारा यांचेकडे पाठवण्यात आला होता. प्रस्तावाची सुनावणी पुर्ण होवून मिनाज मुल्ला उपविभागीय दंडाधिकारी यांनी विजय ऊर्फ पिल्या राजू नलवडे यास सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरीता तड
सातारा : शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीतील मंगळवारपेठ बोगदा येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विजय ऊर्फ पिल्या राजू नलवडे वय 30 वर्ष रा. मंगळवार पेठ सातारा वारंवार गुन्हे करण्यात सरसावलेला असल्याने त्यास सातारा जिल्हयातून तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव शाहुपुरी पोलीस ठाणेकडून पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्फत उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) सातारा यांचेकडे पाठवण्यात आला होता. प्रस्तावाची सुनावणी पुर्ण होवून मिनाज मुल्ला उपविभागीय दंडाधिकारी यांनी विजय ऊर्फ पिल्या राजू नलवडे यास सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरीता तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विजय ऊर्फ पिल्या राजू नलवडे रा. मंगळवार पेठ बोगदा सातारा याचेविरुद्ध सातारा शहर, शाहपुरी पोलीस ठाणे येथे दरोडा, जबरी चोरी करणे, खंडणी, हत्यारानिशी अनाधिकाराने घरात प्रवेश करून दुखापत पोहचवणे, गंभीर दुखापत पोहचविणे, गर्दी-मारामारी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचा भंग करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यास पोलीसांनी वारंवार सुधारणेची संधी देवूनही त्याच्या वर्तनात कोणताही बदल न होता तो वारंवार अधिक गुन्हे करत होता. गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे तो समाजास घातक होवून त्याच्या वर्तनामुळे सामाजिक शांततेस बाधा निर्माण झाली होती. त्यामुळे शाहुपुरी पोलीस ठाणेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी त्याच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सपोनि विशाल वायकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदारांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. या गुंडाची सातारा शहर, राजवाडा, बोगदा मंगळवार पेठ भागात मोठी दहशत होती. त्यास तडीपार करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी कारवाईचे स्वागत केले आहे. नलवडे जर सातारा जिल्हयात मिळून आला तर पोलीसांशी संपर्क साधणेचे आवाहन पोलिसांनी केले आहे.