फलटण प्रतिनीधी:- यावर्षीपासून प्रथम सुरू करण्यात आलेल्या केमिस्टहृदय सम्राट अप्पासाहेब शिंदे दहीहंडी स्पर्धा शिवशंभो बारामती गोविंदांनी जिंकली. प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत शिवशंभो बारामती मंडळाने थरावर थर लावत हंडी फोडली.
महाराष्ट्रात प्रथमच केमिस्टहृदय सम्राट अप्पासाहेब शिंदे यांच्या नावाने फलटण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सभासद व पदाधिकारी यांनी मोती चौक येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी सचिन ढोले,उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस, तहसिलदार अभिजित जाधव असे फलटण तालुक्यातील शासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिवशंभो बारामती व गुणवरे येथील संघांनी सहभाग घेतला होता. दहीहंडी फोडण्याचा मान शिवशंभो बारामती यांना मिळाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
शिवशंभो बारामती संघास ५१ हजार रोख रक्कम पारितोषिक देऊन त्यांचा गौरव सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष संग्रामसिंह धुमाळ, उपाध्यक्ष रणजित कदम तसेच सर्व सभासद व पदाधिकारी यांनी उत्तम आयोजन केले होते. दहिहंडी उत्सव पाहण्याकरता फलटण तालुक्यातील तसेच शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.