लोणंद येथील विकास ननावरे, अमित मोरे सावकारी व जमीन लुबाडण्या प्रकरण
लोणंद ता. खंडाळा येथील विकास प्रमोद ननावरे व अमित रामचंद्र मोरे यांनी सावकारी व जमीन लुबाडण्या प्रकरणी लोणंद पोलीस स्टेशन येथे वारंवार गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करून देखील जाणीवपूर्वक उशिरा गुन्हा दाखल करत व योग्य ती कलमे गुन्ह्यामध्ये न लावल्या प्रकरणी महेंद्र लक्ष्मण अहिवळे, सासवड ता. फलटण यांनी दिनांक 23 नोव्हेंबर 2022 पासून फलटण येथील प्रांत कार्यासमोर उपोषण सुरु केले आहे. आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे. सावकारी आणि अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यास ४ महिने टाळाटाळ केली आहे. तर मा पोलीस अधीक्षक साहेब सातारा यांच्याकडे तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्या मध्ये अनुसूचित जातीच्या लोकांची जमीन हडप केल्याचा गुन्हा असून ही अट्रोसिटी कलम टाकण्यास नकार दिला आहे.
लोणंद पोलीस प्रशासन अहिवळे यांना नाहक त्रास देत आहे याच्या निषेधार्थ अहिवळे यांनी फलटण प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे त्यांना वंचित बहुजन आघाडी फलटण तालुकाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी फलटण तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष संदीप काकडे,सातारा जिल्हा महासचिव अरविंद आढाव, फलटण शहर महिला आघाडीचे अध्यक्ष सौ सपना भोसले, ज्येष्ठ नेते अशोकभाऊ भोसले, अजित कांबळे उमेश कांबळे, मयुरी गायकवाड अश्विनी अहिवळे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.