फलटण प्रतिनिधी -
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक शंकरराव काकडे यांचे अल्पशा आजाराने दि 30-9-2024 रोजी दु:खद निधन झाले. ते 86 वर्षाचे होते.14 ऑक्टोंबर 1956 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी धम्मदिक्षा दिली त्यावेळी अशोक काकडे यांचे वडील शंकरराव काकडे हे पायांनी अपंग असताना त्या ठिकाणी दिक्षा घेण्यासाठी गेले होते. चंदन काकडे (वस्ताद) त्यांचे ते वडिल होते त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सून, नातवंडे, बहिण असे नातेवाईक आहेत. त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विविध पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली