फलटण प्रतिनीधी: क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचा खजिना हौद येथील पुतळा गेली कित्येक दशके क्रांतीची व समाज सुधारणेची प्रेरणा देत उभा आहे या पुतळ्याजवळ असणारा हायमास्ट दिवा अनेकवेळा बंदच असतो बहुतांश वेळा इतर सर्व दिवे सुरू असताना हा दिवा मात्र बंद असतो पालिका प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असा आरोप फुले प्रेमी यांनी केला आहे.
एकीकडे अनेक दिवसापासून रात्रीच्या वेळी सतत बंद असणारा दिवा बंद का आहे अशी विचारणा फुले प्रेमींनी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली असता तांत्रिक बिघाड झाल्याने दिवा बंद असल्याचे अधिकारी यांनी सांगितले. तर दुसरीकडे फलटण पालिका वारंवार या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे फुले प्रेमी कमालीचे नाराज झाले आहेत.
पालिकेतील काही अधिकारी जाणून बुजून सतत बंद राहत असलेल्या दिव्याकडे दुर्लक्ष करतात व फुलेंचा पुतळा अंधारात राहतो सगळ्या जगला क्रांतीचा प्रकाश देणाऱ्या मुलींच्या शिक्षणासाठी ज्ञानाची कवाडे खुली करणाऱ्या महात्मा फुले प्रति पालिकेची ही अनास्था कायम दिसत असून आसपासचे सर्व दिवे सुरू असताना फक्त महात्मा फुले चौकातील दिवाच कसा बंद होतो पालिकेचे अधिकारी कोणच्या कोणाच्या डोक्यातील अंधाराने कारभार चालवत आहेत असा सवाल फुले प्रेमी यांनी केला आहे.
बिना कारभारी सध्या नगर पलिकेचे कामकाज सुरू आहे. मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची बदली झाल्यापासून पालिका कामकाज ठप्प पडले आहे.क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळा जवळ असणारा दिवा अनेकदा बंद असतो बऱ्याच वेळा तर फक्त हाच दिवा बंद असतो पालिका अधिकाऱ्यांनी एकदा काय तो दुरुस्त करुन घ्यावा ज्यांनी समाजाला समतेचा प्रकाश दिला त्यांचा पुतळा अंधारात नसावा हीच अपेक्षा नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे.