काळूबाईनगर नवरात्र उत्सव मंडळ विविध उपक्रमातून हिंदू संस्कृती जोपासण्याचे करीत असलेले कार्य अभिमानास्पद असल्याचे गौ्रोदगार फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी काढले, ते मलटण येथील काळूबाईनगर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते. काळूबाईनगर नवरात्र उत्सव मंडळ, मलटणचे हे 40 वे वर्ष असून यंदाही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्या बद्दल मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी मंडळाचे विशेष कौतुक केले.
यावेळी मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, तसेच विविध गुणदर्शन स्पर्धा मधील विजेत्या स्पर्धाकांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी यावेळी बोलताना, गेल्या 40 वर्षातील नवरात्र उत्सवात झालेला बदलाचे विवेचन करीत महिलांचे विशेष कौतुक केले. यावेळी कार्यक्रमास काळुबाईनगर मधील बहुसंख्य महिला, लहान मुले, मुली, आबाल वृद्ध तसेच मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्याबद्दल मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच काळुबाई नगर महिला उत्सव समितीचे आभार मानले.