फलटण प्रतिनिधी -
फलटण ( बारस्कर गल्ली ) येथे असलेला मेहबूब सुभानी गौस पाक उर्स शरीफ उत्सव हा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून पहावे अशी अपेक्षा फलटण शहर भाजपाध्यक्ष अनुप शाह यांनी व्यक्त केली. सुमारे 100 वर्षाहून अधिककाळ हा उरूस प्रतिवर्षी सामाजिक कार्यकर्ते अजिज भाई शेख यांच्या कुटुंबाकडून साजरा केला जातो. यावर्षी फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांच्या हस्ते या उरुसाचा शुभारंभ करण्यात आला. दरवर्षी या ठिकाणी भंडारा महाप्रसाद आयोजित करण्यात येतो.