वारुंजी (विमानतळ) ता. कराड गावच्या हद्दीत अचानक लागलेल्या आगीत सुमारे आठ एकर ऊस जळून खाक झाला. शुक्रवारी 10 रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास माळ नावाच्या शिवारात ही घटना घडली. यामध्ये ७ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कराड : वारुंजी (विमानतळ) ता. कराड गावच्या हद्दीत अचानक लागलेल्या आगीत सुमारे आठ एकर ऊस जळून खाक झाला. शुक्रवारी 10 रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास माळ नावाच्या शिवारात ही घटना घडली. यामध्ये ७ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वारुंजी गावच्या हद्दीत विमानतळाजवळ माळ नावाचे शिवार आहे. या शिवारात असलेल्या ऊसाला शुक्रवारी सायंकाळी अचानक आग लागली. या आगीत सुमारे आठ एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये ७ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही.