फलटण प्रतिनीधी :- दिल्ली येथील सांसा फाउंडेशनच्या वतीने फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या "शायनिंग महाराष्ट्र २०२४" या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या विविध योजना व खात्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली देण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला आहे. तर कार्यकर्ते व पदाधिकारी या कार्यक्रमाविषयी अनभिज्ञ असल्याचे एका जबाबदार पदाधिकाऱ्यांने सांगितले.
विद्यार्थी, महिला, नागरिक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटाच्या नागरिकांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोफत असताना या प्रदर्शनास फी भरून तिकिटे काढून उपलब्ध असल्याची माहिती फलटण तालुक्यांतील नागरिकांना मिळाली असल्याने तालुक्यांतील अनेक वर्गातील नागरिकांनी या "शायनिंग महाराष्ट्र" प्रदर्शनाकडे पाठ फिरवली आहे. स्थानिक पातळीवर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सहकार्य मिळत नसल्याने व कार्यक्रमाचे नियोजनाचा अभाव यामुळे शासनाचे लाखो रुपये वाया गेल्याचे चित्र आहे.
दिल्ली येथील सांसा फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परंतु सांसा फाउंडेशन नियोजन करण्यात कमी पडल्याने या "शायनिंग महाराष्ट्र" प्रदर्शनाबाबत सर्व सामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहचली नसल्याने केंद्र सरकारचे व राज्य सरकार यांचे विविध उपक्रम सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यात सांसा फाउंडेशनच्या कमी पडल्याचे दिसत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारच्या विविध खाती आणि योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी विविध उपक्रमाचे आयोजन केले जात असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध प्रकारच्या योजना नागरिकांच्या पर्यंत पोहचण्यात आयोजन करणाऱ्या संस्था कमी पडत असल्याने "शायनिंग महाराष्ट्र" हे कार्यक्रम कोठे होणार कोणत्या वेळेत होणार मोफत प्रवेश की तिकीट आकारणार हे लोकांपर्यंत पोहचवण्यात आयोजक कमी पडल्याने सदरचा कार्यक्रम फेल गेल्याचे स्पष्ट दिसत आहे."शायनिंग महाराष्ट्र" या प्रदर्शनाबाबत अनेक जिल्हा कार्यकारणी पासून शहर कार्यकारणीमध्ये समाविष्ट असणाऱ्या पदाधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनीही याबाबत माहिती नसल्याची बाब वरिष्ठ पदाधिकारी यांनी बोलून दाखवली