वाई तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर ३२ वर्षीय तरुणाने महाबळेश्वर आणि वाई तालुक्याच्या परिसरात वेळोवेळी बलात्कार केल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी संशयित आरोपी राजेंद्र महादेव रांजणे (वय ३२) याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले आहे.
वाई : वाई तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर ३२ वर्षीय तरुणाने महाबळेश्वर आणि वाई तालुक्याच्या परिसरात वेळोवेळी बलात्कार केल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी संशयित आरोपी राजेंद्र महादेव रांजणे (वय ३२) याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले आहे.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील आरोपीने महाबळेश्वर व राहत्या घराच्या परिसरात वेळोवेळी बलात्कार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी दि.११ रोजी या घटनेची माहिती देण्यासाठी पीडीत मुलगी आणि तिच्या आईने वाई पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून बाळासाहेब भरणे यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन संशयित आरोपी राजेंद्र महादेव रांजणे याला अटक केली. अधिक तपास पोलीस निरिक्षक बाळासाहेब भरणे करीत आहेत.