सोशल मीडियावर आगार प्रमुख वासंती जगदाळे यांच्या बदलीचे आदेश प्राप्त होतात फलटण तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनातील कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी यांनी पत्रकारांचे व वृत्तपत्रांचे आभार मानले.
फलटण प्रतिनीधी:- फलटण तालुक्यातील महिलां अष्टविनायक यात्रेतील चार एसटी गाड्यांमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या घोटाळा प्रकरणी खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनीं याप्रकरणी लक्ष दिल्यानंतर फलटण आगार व्यवस्थापक वासंती जगदाळे यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आली आहे.
फलटण तालुक्यातील महिलांनी अष्टविनायक यात्रेसाठी केलेल्या चार गाड्याची रक्कम राजेंद्र वाडेकर साहाय्यक वाहतूक अधीक्षक यांनी प्रवास करणाऱ्या महिलाकडून ऑनलाईन वरून स्वतःच्या खात्यावर पैसे मागून घेतल्याची बाब भरारी पथकाने उघड केली होती या प्रकरणी राजेंद्र वाडेकर साहाय्यक वाहतूक अधीक्षक यांच्यावर दिनांक १४ रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
फलटण आगारात काम करणाऱ्या फलटण आगाराच्या व्यवस्थापक वासंती जगदाळे यांची कामाचा कार्यकाळ चांगलाच वादग्रस्त राहिला आहे. नागरिकांशी उद्धटपणे बोलणे, वाहतूक व्यवस्था व नियंत्रण व्यवस्थित न ठेवणे, याचबरोबर अनेक कर्मचारी यांनी वासंती जगदाळे यांच्या कामाबद्दल तक्रारी केल्या होत्या. तालुक्यातील एसटी गाड्यांची वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले होते तालुक्यातील प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. काही दिवसांपूर्वीच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण आगारला भेट देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या वाढवावे पूर्वीप्रमाणे ते वेळापत्रक करावे फलटण आगाराने आपला कारभार सुधारावा अन्यथा मला कठोर भूमिका घ्यावी लागेल असा इशारा दिला होता परंतु यानंतरही त्यांच्या कामकाजात कोणती सुधारणा झाली नव्हती.
यानंतर माल वाहतूक घोटाळा, अष्टविनायक घोटाळा, मारुती यात्रा घोटाळा प्रकरणात वासंती जगदाळे यांचा सहभाग असल्याची बाब दबक्या आवाजात बोलली जात होती परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून याबाबत चौकशी करून कारवाई होत नव्हती. वासंती जगदाळे यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये फलटण आगाराचा कार्यभार स्विकारला होता.केवळ आठ महिन्यांतच वासंती जगदाळे यांची फलटण आगारातून कार्यमुक्ती झाली आहे. नुकताच फलटण आगारातील ‘अष्टविनायक दर्शन यात्रेतील तिकिटांच्या पैशांचा अपहार उघडकीस आला होता; आगार प्रमुख वासंती जगदाळे यांच्या बाबत खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी लक्ष दिले होते.
काल दिनांक १६ रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मा. महाव्यवस्थापक (क व औ.सं) यांनी याप्रकरणी तत्काळ कारवाई करत दूरध्वनी संदेशान्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ उप महाव्यवस्थापक नियंत्रण समिती १ मुंबई/पुणे प्रदेश यांनी लेखी स्वरूपात फलटण आगार व्यवस्थापक वासंती जगदाळे यांची प्रशासकीय बदली करत चंदगड आगार कोल्हापूर विभाग करण्याचा आदेश देऊन तत्काळ दिनांक १६ रोजी बदलीच्या आदेशनव्ये बदलीच्या ठिकाणी हजर होण्याकरिता म. ऊ कार्यमुक्त करण्यात आले.
माल वाहतूक घोटाळा, अष्टविनायक घोटाळा, मारुती यात्रा घोटाळा अशा विविध घोटाळा प्रकरणीप्रकरणी अनेक समाजिक संघटना व अनेक पक्षाचे पदाधिकारी हे तक्रारी दाखल करत असून येणाऱ्या काळात याबाबत तपशीलवार चौकशी अंती आणखी कोण कोणते एसटी महामंडळातील अधिकारी जबाबदार आहेत हे पण उलगडणार असून याप्रकरणी अंतिम चौकशी अंती एसटी महामंडळ जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता पुढचा नंबर कोणाचा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.