शस्त्रबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी चार जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वाई : शस्त्रबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी चार जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ ऑक्टोंबर रोजी ११.४५ वाजण्याच्या सुमारास वाई पाचगणी मार्गावर रेखा फूड प्रॉडक्ट नावाच्या दुकानाच्या गेट समोर असणाऱ्या फुटपाथवर नितीन विजय भोसले, वय १९, रा. सिद्धनाथवाडी, ता. वाई, विजय लक्ष्मण अंकुशी, वय २१, रा. धोम कॉलनी, वाई आणि ललितोप नवरे, रा. सिद्धनाथ वाडी, मुनिल जाधव यांच्याकडे बेकायदा, बिगर परवाना कोयते आढळून आले. सध्या जिल्ह्यामध्ये शस्त्रबंदी आदेश लागू असताना या आदेशाचे त्यांनी उल्लंघन केल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर यांनी वाई पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.