फलटण प्रतिनिधी -
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र लढ्यातील प्रथम सशत्र क्रांतीकारक आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्षीय समिती 2025 च्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी गणेश अहिवळे, अजय काकडे, सुरज काकडे, सिद्धार्थ अहिवळे, गोविंद काकडे, चंद्रकांत मोहिते, मंगेश सावंत, कपिल काकडे आदी उपस्थित होते.