ट्रॅक्टरचे काम करीत असताना टायर फुटून डिस्क चेहऱ्यावर लागून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
कोरेगाव : ट्रॅक्टरचे काम करीत असताना टायर फुटून डिस्क चेहऱ्यावर लागून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धामणेर, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत एका गॅरेजमध्ये ट्रॅक्टर चे काम करीत असताना ट्रॅक्टर टायर फुटून त्याची डिस्क चेहऱ्यावर लागून गंभीर जखमी झालेल्या निखिल महादेव ढेरे, वय १८, राहणार धामणेर याच्यावर सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची खबर वैद्यकीय अधिकारी चेतन काळे यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली.