फलटण प्रतिनिधी -
फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी केंद्रीय रेल्वे कमिटी सदस्य बापूसाहेब तथा बी. टी. जगताप यांना यावर्षीचा राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 नुकताच प्रदान करण्यात आला.
सामाजिक समतेचा आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव म्हणून कोल्हापूर येथील मानवतावादी सांस्कृतिक चळवळ 'दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट' यांच्या वतीने त्यांना राष्ट्रीय स्तरावरील राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार 29 जून 2025 रोजी कोल्हापूरच्या राजश्री शाहू स्मारक भवनात देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत रसाळे, प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने, विश्वासराव तरटे, अंकिता कोल्हापूरकर, अर्हत मिनचेकर आदी मान्यवर उपस्थित होते.