विषारी औषध प्राशन केलेल्या कारंडवाडी, ता. सातारा येथील एकाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
सातारा : विषारी औषध प्राशन केलेल्या कारंडवाडी, ता. सातारा येथील एकाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तुकाराम हणमंत केंजळे, वय ४५, रा. कारंडवाडी, ता. सातारा यांनी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असताना दि. १८ रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.