फलटण प्रतिनिधी:-
मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे भटक्या कुत्र्यांच्या बाबत अनेक वेळा तक्रारी करूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या कार्यालयातच आंदोलन करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
फलटण शहरामध्ये मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे. हे मोकाट कुत्रे रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या अनेक लहान मुलांना व मोठ्या व्यक्तींना चावा घेत आहेत. मोकाट कुत्र्यांच्या या प्रकारामुळे शहरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
फलटण शहरात भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. मात्र याची पर्वा नगरपालिकेला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा विषय गंभीर बनला आहे पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेवून जखमी केले आहे. फलटण नगर पालिका हद्दीत आजपर्यंत एकदाही परिसरात कुत्री पकडण्याची मोहीम राबविली गेली नसल्याचे शहरातील अनेक भागात कुत्र्यांचा उच्छाद झाला आहे.
भटक्या कुत्र्यांची समस्या इतकी गंभीर असूनही कायमस्वरुपी इलाज करण्याचा प्रयत्न आजपर्यंत नगर पालिकेकडून झालेला नाही. नागरिकांना दिवस रात्र शहरात जीव मुठीत धरूनच फिरावे लागते. कारण कोपऱ्या-कोप-यावर विशेषत: चिकन, मटनाची दुकाने, चायनीजचे गाडे जिथे आहेत. त्या परिसरात ही कुत्री टोळीने असतात. मुले किंवा माणूस दिसला की हल्ला करतात.असे अनेक प्रकार घडत असताना याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे मोकाट कुत्र्यांची शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
नागरिकांकडे वैयक्तिक मालकीचे कुत्रे असतील त्यांचे गळ्यात पट्टे आणि त्यांचे पासून नागरिकांना, शेजारी यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचना व आदेश नगर पालिकेने काढावेत. हडको कॉलनी, आनंदनगर, संजिवराजे नगर परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा फलटण नगर पालिकेकडे अनेक भटक्या कुत्र्यांच्या तक्रारी करूनही नगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने फलटण शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
शहरात मुख्य बाजारपेठेसह अनेक ठिकाणी मोकाट जनावरे,कुंत्र्यांनी हैदोस घातला आहे.काही दिवसापूर्वी नगर पालिकेने अनेक मोकाट गुरे-ढोरे जनावरांना पकडले,काहींना दंड आकारला.यानंतर आता शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ सुरु झाला आहे. अनेक भागात वीस ते पंचविस कुत्र्यांचा कळप शहरात फिरत आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीकरण करण्याची आवश्यकता असून नगर पालिका प्रशासन जाणीव पूर्वक भटक्या कुत्र्यांच्याबाबत कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नसल्याने शहरातील नागरिकांनी पुढील काळात नगरपालिकेच्या विरोधात सनदशील मार्गाने आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.