बुलढाणा अर्बन परिवारातर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने फलटण येथे विविध व्यवसायातील यशस्वी महिलांना सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पवारवाडी (आसू ) ग्रामपंचायत सदस्या सौ. उज्वला भोसले, बुलढाणा अर्बन मॅनेजमेंट सर्विसेस सातारा विभागाचे विभागीय अधिकारी प्रशांत पाटिल व फलटण शाखेचे शाखा अधिकारी कृष्णाथ वायफळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रशांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, संस्थेचे उद्धिष्ट नेहमीच महिला सक्षमिकरण व समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाकडे असते. आजची महिला ही घर-परिवार सांभाळून पुरुषांसोबत काम करताना दिसत आहे. बचतगट कर्जाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या कुटुंबाची प्रगती कशी करू शकतो याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली.
पवारवाडी (आसू ) ग्रामपंचायत सदस्या सौ.उज्जवला भोसले यांनी महिलांनी आपल्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यासाठी आवाहन केले. यावेळी विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांना सन्मानपत्र देऊन गौवण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार फलटण शाखेचे शाखा अधिकारी कृष्णाथ वायफळकर यांनी मानले. यावेळी फलटण शाखेचे अधिकारी, कर्मचारी व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.