फलटण प्रतिनिधी - ३ जानेवारी २०२४
फलटण मध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीतून मराठयांनी चलो मुंबईचा नारा दिला असून मुंबईतील उपोषणाला जाण्यासाठी बैठक घेण्यात आली, मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी लाखो बांधव जाणार असून ओबीसीतून आरक्षण मिळालेशिवाय माघार नाही असा निश्चय केला आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला असून मला भेटण्यासाठी मराठा समाजाने यावे असे आवाहन केले असून या आवाहनाला प्रतिसाद देत चलो मुंबई चलो मुंबई चा नारा मराठा क्रांती मोर्चा फलटण ने दिला असून मुंबई ला जाण्याच्या तयारीची आज फलटण येथे नियोजन बैठक झाली असून संपूर्ण फलटण तालुक्यातील मराठा बांधव मुंबईला हजारोंच्या जाणार आहेत.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारी ला आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असून त्यांच्या भेटीला फलटण तालुक्यातील मराठा बांधव आपल्या ट्रॅक्टर,ट्रॉली सह टेंपो,व ट्रक सह आदेश येताच रवाना होणार आहेत, त्या अनुषंगाने आज बुधवार दि.3 जानेवारी ला मुख्य समन्वयकांची जाधववाडी(फ.)येथे बैठक झाली,त्या बैठकीत सर्वांनी मुंबई दौऱ्यावर जाण्याच्या तयारीची चर्चा करून विविध विषयांवर अनेक समनवयकांनी मार्गदर्शन केले,व फलटण तालुक्यातील सात जिल्हा परिषदेच्या गटातील प्रत्येक गावातील मराठा बांधव हे मुंबईतील उपोषणात सहभागी होणार असून त्या संदर्भात मुख्य समन्वयक हे गावागावात भेट देणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार दि.8 जानेवारी ते 10 जानेवारी रोजी भेटी होणार असून साखरवाडी,तरडगाव,गिरवी,हिंगणगाव,बरड,विडणी,गुणवरे,या जिल्हा परिषदेच्या गटातील प्रत्येक गावात बैठक तसेच त्या गावातील ट्रॅक्टर,ट्रक,टेंपो,व इतर वाहनांची व्यवस्था,तसेच हे उपोषण किती दिवस चालेल याचा अंदाज घेऊन,तशी भोजनाची व राहण्याची व्यवस्था होण्यासाठी जे भाविक आळंदी ते पंढरपूरला वारीसाठी जातात अशा वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शन घेऊन तशा पद्धतीने नियोजन केले जाणार आहे.
दरम्यान आज झालेल्या बैठकीत कोणत्याही राजकीय पक्ष अथवा व्यक्तीकडून वाहने अथवा इंधन किंवा इतर सामग्री घ्यायची नाही असा ठराव करण्यात आला असून जे काही लागेल ते आपापल्या गावाने व्यवस्था करायची असून ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असे ठरले आहे.