फलटण प्रतिनिधी :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) जिल्हा सचिव विजय येवले यांची सातारा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य पदी नुकतीच निवड करण्यात आली.
विजय येवले हे गेली 40 वर्षाहून अधिक काळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे अत्यंत जवळचे निष्ठावंत म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे.
विजय येवले यांच्या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुधीर अहिवळे यांच्या हस्ते पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रिपाईचे संजय निकाळजे जिल्हा कार्यकारिणी सदस्य, राजू मारुडा जिल्हा उपाध्यक्ष, मुन्ना शेख जिल्हा सेक्रेटरी, सतीश अहिवळे अध्यक्ष फलटण तालुका, दीपक अहिवळे सचिव फलटण तालुका, तेजस काकडे उपाध्यक्ष फलटण शहर, परविन शेळके सहसचिव फलटण तालुका, उमेश गायकवाड तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.