नाशिक, दि.५:- प्रभाग क्रमांक 16 संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे प्रदेश नेते महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिका उद्यान अधिक्षक श्री.विवेकजी भदाणे साहेब यांची भेट घेऊन वरील आशयाचे निवेदन देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा आहे की प्रभाग क्रमांक 16 येथील ड्रीम सिटी ते आगर टाकळी रोड येथे बंगाली यांच्या घराजवळ नाल्याच्या कोपऱ्यावर अनेक वर्षांपासून उमराचे झाड होते त्या झाडांमुळे आजतागायत कोणत्याही प्रकारचा अपघात झाला नाही परंतु मनपा अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमत करून सदरचे झाड पुनर्रोपणाच्या नावाखाली तोडून टाकण्यात आले सदरचे झाड विनापरवानगी एका मोकळ्या जागेत लावण्यात आले परंतू सदरच्या झाडाची कोणतीही निगा राखण्यात आली नाही तरी हया प्रकरणाची चौकशी करण्यात येऊन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या वर कठोर कारवाई करण्यात यावी व संबंधित अधिकारी यांना निलंबित करावे व सदरचे झाड पुनर्जीवित करावे अन्यथा निसर्ग प्रेमी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करतील..
याप्रसंगी रिपाईचे प्रदेश नेते महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे,प्रभागाचे नेते रमेशजी साळवे,रविभाऊ जाधव,संजयजी साळवे, दिलीप गांगुर्डे ,युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.