फलटण प्रतिनिधि -
स्व.सुभाष भाऊ शिंदे यांच्या गटाचं ठरलं असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश करणार आहेत.
फलटण तालुका राष्ट्रवादी कांग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा चेतन शिंदे व युवक नेते चेतन शिंदे यांनी आपल्या सहकार्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पुणे येथे भेट घेवुन, महायुतीचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ साखरवाडी येथे सभा होत आहे. त्यावेळी शिंदे यांचा सांयकाळी ५ वा. जाहीर प्रवेश होणार आहे.