फलटण प्रतिनिधि : ११ नोव्हेंबर २०२४
फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची सभा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते - पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सभा आज दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता साखरवाडी येथे होणार आहे. त्यामुळे नक्की खासदार मोहिते पाटील काय बोलणार याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या साखरवाडी येथे संपन्न झालेल्या सभेला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला होता. त्या सभेत पवार यांनी रामराजेंवर टिकेची झोड उठवली होती. तर श्रीमंत असा उल्लेख अनेक वेळा केला होता.
आज होत असलेल्या खासदार धैर्यशील मोहिते - पाटील यांच्या सभेला नक्की कसा प्रतिसाद मिळतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. असून अजित पवार यांना या सभेतून जोरदार प्रत्युत्तर मिळण्यार असल्याचे बोलले जात आहे.
गत दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ साखरवाडी येथे जाहीर सभेमध्ये राजेगटासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्षावर सडकून टीका केली होती. त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सभेचे आयोजन साखरवाडी मध्ये करण्यात आले आहे.