फलटण प्रतिनिधी -
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गावची शेती, आणि समृद्ध विचाराने लोकांची मस्तके परिवर्तन करण्यासाठी आलेल्या कृषीदूतांनी मानेवाडी (ता. फलटण) गावचा हुबेहूब नकाशा चक्क खडू रांगोळीतुन रेखाटल्याने गावाकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.
बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत निखिल सोडल,शिवराज घोडके, यशराज खटके,साहिल भिलारे, अपूर्व बांगर, ओमप्रकाश साळुंखे,ग्रामीण कृषी
कार्यानुभव उपक्रमांतर्गत मानेवाडी येथे तीन महिने मुक्कामी आहेत. कृषी कार्यानुभव अंतर्गत सुरु असलेल्या अनेक प्रयोगांनी व प्रत्यक्षिकांनी येथील नागरिकांना दिलासा देण्याचे काम हे कृषीदूत करत आहेत.
या कृषीदूतांना संस्थेचे मुख्याधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड व एस. व्ही. बुरुंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. हे कृषीदूत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ग्रामीण कृषी जागरूकतेविषयी मार्गदर्शन करत आहेत.