मलकापूर नगरपालिकेला विविध नाविन्यपुर्ण संकल्पनेचा वारसा आहे. त्यानुसार नगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकत ‘माणुसकीच घर’ नावाचा नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेतला आहे. नगरपालिका बहुउद्देशिय विस्तारित इमारत झेड.पी कॉलनी, पाणी बील संकलन केंद्र येथे ‘माणुसकीच घर’ नावाचा उपक्रम उभारला आहे. गुरुवारी ९ रोजी यांसंकल्पनेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
कराड : मलकापूर नगरपालिकेला विविध नाविन्यपुर्ण संकल्पनेचा वारसा आहे. त्यानुसार नगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकत ‘माणुसकीच घर’ नावाचा नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेतला आहे. नगरपालिका बहुउद्देशिय विस्तारित इमारत झेड.पी कॉलनी, पाणी बील संकलन केंद्र येथे ‘माणुसकीच घर’ नावाचा उपक्रम उभारला आहे. गुरुवारी ९ रोजी यांसंकल्पनेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
यावेळी मलकापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन सभापती प्रशांत चांदे, महिला व बालकल्याण समिती सभापती शकुंतला शिंगण, उपसभापती स्वाती तुपे, नगरसेवक सागर जाधव, जिल्हा परिषद सेवकांची गृहनिर्माण सह. संस्थेचे चेअरमन भरत पाटील, व्हा. चेअरमन शरदचंद्र देसाई सचिव टी. डी. कुंभार, मारुती पाटील, सत्यवान चव्हाण, किशोर साळुंखे, उदय काळे, अनिस मणेर, एल. के. मुल्ला, संजय जाधव, गरूड, बापु पाचपुते, आरोग्य विभाग प्रमुख प्रिया तारळेकर, शहर समन्वयक पुंडलिक ढगे, संपत हुलवान, दिलीप साठे, सावकार देवकुळे, अमर तडाखे, हेमंत पलंगे, रुपाली ढापरे, पाणीबील संकलन कर्मचारी अनिता सुर्यवंशी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
‘माणुसकीच घर’ या उपक्रमाच्या ठिकाणी जुनी कपडे, जुनी भांडी, जुनी पुस्तके, जुनी वापरणे योग्य चप्पल, स्वच्छ प्लास्टिक वस्तु, इलेक्ट्रॉनिक वस्तु आदींचे संकलन केले जाणार असून त्याचे वाटप गरजू, गरिब नागरिकांना करण्यात येणार आहे.
शहरी व नागरी कार्यमंत्रालय, दिल्ली यांच्या स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासनअंतर्गत माझी वसुंधरा 2.0 अभियान यांचे मार्गदर्शन पुस्तिकेनुसार सुक्या कचऱ्याचे प्रमाण घटविणे, पुर्नवापर, पुर्नप्रक्रिया या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन करण्यात येत आहे.
या उपक्रमात नगराध्यक्षा निलम येडगे, शरदचंद्र देसाई, भरत पाटील, श्रीकांत शिंदे, अभिजीत यादव, राजलक्ष्मी खामकर यांनी साड्या, शर्ट, टि-शर्ट, पॅन्ट, शॉल, जॅकेट, भांडी इ. जमा केले. यामुळे अंदाजे 20 किलो टाकाऊ वस्तुचे टिकाऊमध्ये रुपांतर झाले आहे.
भरत पाटील यांनी नगरपरिषदेच्या या नाविन्यपुर्ण उपक्रमाची स्तुती करून नागरिकांनी आपल्याकडील जुनी कपडे माणुसकीच घर संकलन केंद्रामध्ये जमा करणेचे आवाहन केले. नगराध्यक्षा सौ. निलम येडगे यांनी जुनी कपड्यांबरोबरच ई-वेस्ट, प्लास्टिक, जुनी चप्पल इ. वस्तु जमा कराव्यात जेणेकरून सर्व बाबींचे रिसायकलींग करणे शक्य होईल व कचऱ्याचे प्रमाण घटविणेस मदत होऊन शासनाचे 3R Principal साध्य होऊन पर्यावरण संवर्धन होणेस मदत होईल, असे सांगितले तसेच उपस्थितांचे आभार मानले.