फलटण - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाली. या दिवशी फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी फलटण शहरासह तालुक्यातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र या वर्षी कडक उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून एका परप्रांतीय शेखर नामक व्यक्तीने भीम अनुयायांसाठी शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची मुबलक व मोफत सोय केली होती.
फलटण येथे येणाऱ्या भीम अनुयायांना वेगवेगळ्या मंडळाकडून अन्नदान करण्यात येते. यावेळी मुबलक व शुद्ध पाणी तेवढेच गरजेचे असते. हीच गरज ओळखून परप्रांतीय युवक शेखर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शुद्ध व थंड पाणी शेकडो लोकांना उपलब्ध करून दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.