सातारा नगरपालिकेचे निवडणुकीचे वातावरण तापू लागल्यामुळे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. खा. उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आरोपावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सातारा : सातारा नगरपालिकेचे निवडणुकीचे वातावरण तापू लागल्यामुळे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. खा. उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आरोपावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
शिवेंद्रराजे म्हणाले, तुम्ही कसेही जा, पण नगरपालिकेला लोळवायची वेळ आणू नका. त्यांनी म्हटले, त्यांना पेट्रोल परवडत नाही. मग 80 लाखांची बीएमडब्ल्यू कशी परवडते? सातारा नगरपालिकेत गेली साडेचार वर्षे झाली कोणतीही कामे झालेली दिसत नाहीत. पालिकेत भ्रष्टाचार बोकळला आहे. सत्ताधारीचे नगरसेवक एकमेकांच्यावर आरोप करत आहेत. सातारा विकास आघाडीने मागील साडेचार वर्षात काय केले हा माझा विचारायचा अधिकार आहे, असे शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरचे सातारा हद्दीतील टोलनाके कोण चालवतं हे सर्वांना माहीत आहे. तुम्ही खासदार असूनही मग या रस्त्याची अवस्था अशी का? असा टोलाही आमदार शिवेंद्रराजे यांनी लगावला आहे.
रविवारी उदयनराजेंचा युवकांबरोबर संवाद आहे. नेमका हा संवाद निवडणुकीच्या आधीच का सुचला? पाच वर्षे नेमकं उदयनराजेंनी काय केलं? 5 वर्ष युवक नव्हते का? असे सवालही शिवेंद्रराजे यांनी उपस्थित केले आहेत.