मंगळवारी मंत्री शंभूराज देसाई हे या बंगल्यात काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत बसले असताना या बंगल्याच्या आवारात हा बिबट्या आला. त्यानंतर लोकांनी आरडा- ओरडा केल्यानंतर या बिबट्याने त्या ठिकाणावरून धूम ठोकली. मंत्री शंभूराज देसाई हे स्वतः निवासस्थानाच्या शेजारील लाॅनवरती असताना बिबट्याचा निवासस्थानी वावर होता.
पाटण : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील मरळी- दाैलतनगर गावातील बंगल्याच्या जवळ मंगळवारी 7 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. अचानक आलेल्या या बिबट्यामुळे सर्वांचीच भांबेरी उडाली.
मंगळवारी मंत्री शंभूराज देसाई हे या बंगल्यात काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत बसले असताना या बंगल्याच्या आवारात हा बिबट्या आला. त्यानंतर लोकांनी आरडा- ओरडा केल्यानंतर या बिबट्याने त्या ठिकाणावरून धूम ठोकली. मंत्री शंभूराज देसाई हे स्वतः निवासस्थानाच्या शेजारील लाॅनवरती असताना बिबट्याचा निवासस्थानी वावर होता.
तसेच मरळी गावचे माजी सरपंच प्रविण पाटील यांच्यासह काही कार्यकर्ते निवासस्थानी चर्चा करत असताना बिबट्या शेजारील परिसरात आला होता. दलतनगर- कारखाना येथील निवासस्थानी आलेल्या बिबट्याच्या बातमीमुळे मरळी गावासह परिसरातील गावात घबराटीचे वातावरण आहे.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करून सदरच्या घटनेची माहिती देवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर मरळी गावात आज बुधवारी दि. 8 रोजी सातारा जिल्हा वनविभागाचे महादेव मोहिते, पाटणचे वनविभाग अधिकारी पोतदार यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.