राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आ. दीपक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर व माजी पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उद्या सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी प्रवेश करणार आहेत. खा. शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण येथे प्रवेश होणार असून यावेळी जाहीर सभा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फलटणमध्ये मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर महायुतीमध्ये असणार आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उद्या पुन्हा एखदा स्वगृही परतणार आहेत.