एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला उपाशीपोटी ठेवून तिचा छळ करणाऱ्या सातारा तालुक्यातील ब्राम्हणवाडी पती, सासू, सासरे, दीर अशा चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती मनोज माने, सासू प्रभावती माने, सासरे मधुकर माने आणि दिर शैलेश माने (सर्व रा. ब्राम्हणवाडी, तासगाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून
सातारा : सातारा येथील सदरबझार परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला उपाशीपोटी ठेवून तिचा छळ करणाऱ्या सातारा तालुक्यातील ब्राम्हणवाडी पती, सासू, सासरे, दीर अशा चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती मनोज माने, सासू प्रभावती माने, सासरे मधुकर माने आणि दिर शैलेश माने (सर्व रा. ब्राम्हणवाडी, तासगाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, मधूरा मनोज माने (वय ४१, रा. देवी कॉलनी, सदरबझार, सातारा. मूळ रा. ब्राम्हणवाडी, तासगाव, ता. सातारा) या अकौंटंट असून त्यांचा विवाह मनोज मधुकर माने यांच्याशी झाला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २00८ ते १६ सप्टेंबर २0२१ या कालावधीत मधुरा यांना पती मनोज मधूकर माने याने शारीरिक, मानसिक त्रास देत दारुच्या नशेत मुलींना शिवीगाळ, मारहाण केली. तसेच लग्नात घातलेले मंगळसूत्र घेवून कर्ज फेडण्यासाठी ते गहाण ठेवले होते. दरम्यान, पती मनोज हा मधुरा यांच्या चारित्र्यावर संशय घेवून त्यांना सतत मारहाण करत होते. सासू प्रभावती मधूकर माने ही मधूरा यांना उपाशीपोटी ठेवत होत्या तर सासरा मधूकर भिकाजी माने आणि दिर शैलेश मधूकर माने हे सतत टोचून बोलत होते. मधूरा यांना या चौघांकडून मुंबई, पुणे आणि गोडोली येथे त्रास दिला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यास कंटाळून मधूरा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दि. १0 रोजी तक्रार दिली आहे. याप्रकरणी पती मनोज माने, सासू प्रभावती माने, सासरे मधुकर माने आणि दिर शैलेश माने या चौघांवर गुन्हा दाखल झाला असून रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक झालेली नव्हती. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करत आहेत.