सैदापुर, ता. सातारा येथे राहत्या घरासमोर बेशुद्ध पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
सातारा : सैदापुर, ता. सातारा येथे राहत्या घरासमोर बेशुद्ध पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २२ ऑक्टोंबर रोजी दीड वाजण्याच्या पूर्वी सैदापूर येथील काळे वस्ती येथे राहत्या घरासमोर तेथीलच अमोल संजय गोळे, वय २१ हे राहत्या घराच्या बाहेर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची खबर वैद्यकीय अधिकारी भोसले यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली.