फलटण प्रतिनिधी - फलटण-कोरेगाव विधानसभा (अ. जा. ) मतदार संघाचे आमदार सचिन पाटील यांनी आज सोमवारी सपत्नीक शिंगणापूर ता. माण येथे शंभू महादेवाचे दर्शन घेतले. मतदारसंघासाठी विकासाची नांदी ठरो, प्रत्येक नागरिकाचे जीवन आरोग्यदायी, समृद्ध व सुखी होवो अशी प्रार्थना शंभू महादेवाचे चरणी आमदार पाटील यांनी केली.