फलटण प्रतिनिधी:- जाधववाडी (फ) ग्रामपंचायत हद्दीत पक्की घरे असणाऱ्यांना घरकुल मंजुर झालेबाबत जाधववाडी गावातील ग्रामस्थांने घरकुल योजनेची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या तक्रारीत दत्तात्रय पांडुरंग मदने यांनी जाधववाडी (फ) ग्रामपंचायत हद्दीतील पक्की घरे असणाऱ्यांना घरकुल मंजुर झाले असल्याची लेखी तक्रार दिली असून या तक्रार अर्जात ग्रामपंचायत जाधववाडी (फ) हद्दीतील ५ ते ६ ग्रामस्थांना पक्की घरे असुन त्यांना घरकुल मंजूर झाली आहेत. दत्तात्रय पांडुरंग मदने हे गेली ५ ते ६ वर्षे झाली ग्रामसभेत घरकुल मंजुर करावे म्हणून मागणी करीत आहे परंतु त्यांना कोणीही दाद देत नाहीत असे नमूद केले आहे.
जाधववाडी (फ) ग्रामपंचायत ग्रामसेवक दत्तात्रय पांडुरंग मदने यांना अरेरावी व एकेरी भाषा वापरत आहेत. ज्यांना रहायला घर नाही त्यांना घरकुल मंजुर होत नाही. ग्रामसेवक विजय निंबाळकर व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सल्याने राजकारणाच्या सोईसाठी गाव पुढाऱ्यांनी पक्के घर वाल्यांना घरकुल मंजूर केली आहेत. ज्यांची घरकुल मंजूर झाली आहेत त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी दत्तात्रय पांडुरंग मदने यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
जाधववाडी (फ) ग्रामपंचायत हद्दीतील घरकुल योजनेची चौकशी करण्याची मागणी करताना ज्यांना घरकुल योजना मंजूर झाली आहेत अशा सर्व लाभार्थी यांची चौकशी करण्याची आवश्यकता असून पक्की घरे तसेच आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्या नोकरी करत असणाऱ्या नागरिकांना तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी यांच्या कुटुंबातील सदस्यांना घरकुल योजना मंजूर करण्यात आली असून गरीब व गरजू नागरिकांना घरकुल योजना यादीत समाविष्ट करण्यात येत नसल्याने ग्रामसेवक विजय निंबाळकर यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जे खरे लाभार्थी आहेत ज्यांना घरकुल योजनेची आवश्यकता आहे तसेच जे घरकुल योजनेचे निकष पूर्ण करतात त्यांना घरकुल लाभ न देता मनमानी पद्धतीने ग्रामपंचायत स्तरावर काम सुरू आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आली आहे.